अहमदनगर जिल्ह्याला भेट : आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी जाणल्या समस्यागडचिरोली : आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गावांना भेट देऊन पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी शनिवारी केली. व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत शासनस्तरावर या समस्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासनही दिले. तसेच लोणी, हवेली येथे सरपंच सुभाष दुधाडे यांनी गावात केलेल्या जलसंधारणांच्या कामांची पाहणी केली. तसेच सुपा ग्राम पंचायत, निघोज येथील विविध जलसंधारण कामाला भेटी दिल्या. दरम्यान परसराम कोल्हे, बाजीराव दुधाडे यांनी कांदा व दुधाचे भाव वाढवून गावात जलसंधारणासाठी निधी देण्याची मागणी केली. कामात कुचराई न करता जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे व लोकांची सेवा करावी, असे निर्देशही अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले. कांदा व दूध भाव वाढ तसेच पाणी प्रश्नाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार, कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असेही अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेटीदरम्यान सांगितले. (शहर प्रतिनिधी)
पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी
By admin | Updated: May 30, 2016 01:29 IST