धानाेरा तालुक्यातील दुकानांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:12+5:302021-05-09T04:38:12+5:30

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव ...

Inspection of shops in Dhanera taluka | धानाेरा तालुक्यातील दुकानांची तपासणी

धानाेरा तालुक्यातील दुकानांची तपासणी

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरीसुद्धा ग्रामीण भागात किराणा दुकानांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे दिसून येते. कायद्याचे होणारे उल्लंघन राेखण्यासाठी मुक्तिपथ अभियानाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील दुकानदारांपर्यंत पोहाेचण्याचा मुक्तिपथचा मानस असून धानोरा तालुक्यातील खरकाडी, मरकागाव, जपतलाई, चुडियाल आदी गावातील किराणा दुकानांना मुक्तिपथ तालुका चमू, सरपंच, उपसरपंच व गाव संघटनेच्या सदस्यांनी संयुक्तरित्या भेट दिली. दरम्यान, काही दुकानात आढळलेला तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करीत ‘तंबाखूमुळे कोरोना पसरतो व कॅन्सर होतो. या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही’ अशा आशयाचे हमीपत्र व्यावसायिकांच्या स्वाक्षरीनिशी दुकानासमोर लावण्यात आले. तंबाखूयुक्त पदार्थांच्या विक्रीवर शासकीय बंदी आहे. खर्रा, गुडाखू, नस विकणे शासकीय आदेशानुसार गुन्हा आहे, असे तंबाखूचे दुष्परिणाम सांगत जनजागृती करण्यात आली.

===Photopath===

080521\08gad_3_08052021_30.jpg

===Caption===

दुकानासमोर हमीपत्र चिकटवताना व्यावसायिक.

Web Title: Inspection of shops in Dhanera taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.