पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:38 IST2018-08-19T23:37:43+5:302018-08-19T23:38:46+5:30

अहेरी व आलापल्ली परिसरात गुरूवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक नागरिकांची घरे, गुरांचे गोठे कोसळले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Inspection by flood affected areas by Guardian Minister | पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

ठळक मुद्देआलापल्ली व अहेरी येथे भेट : सखल भागातील घरांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अहेरी व आलापल्ली परिसरात गुरूवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही गावातील अनेक नागरिकांची घरे, गुरांचे गोठे कोसळले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, तहसीलदार प्रशांत घोरूडे, अहेरी भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी अध्यक्ष मुकेश नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष नागेश रेड्डी फिरोज शेख, सलिम शेख, शकुंतला दुर्गम, रहिमा सिध्दीकी, सागर डेकाटे, गुड्डू ठाकरे, विनोद ठाकरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे अहेरी व आलापल्ली भागातील सखल भागात पाणी साचले. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू खराब झाल्या. तर काही वस्तू वाहून गेल्या. पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला. एकंदरीतच अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले. याची व्यथा गावकºयांनी पालकमंत्र्यासमोर मांडली. सखल भागातील गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी व आलापल्ली येथील नुकसानग्रस्तांना दिले.

Web Title: Inspection by flood affected areas by Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.