अहेरीत २२ रुग्णांची तपासणी
By Admin | Updated: March 1, 2015 01:46 IST2015-03-01T01:46:11+5:302015-03-01T01:46:11+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसीन विभागात २२ रुग्णांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

अहेरीत २२ रुग्णांची तपासणी
अहेरी : येथील उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसीन विभागात २२ रुग्णांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र आधुनिक काळात कृष्णधवल मशीनचाच वापर करण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंत्रज्ञ डॉ. अनंत कुंभरे, डॉ. ए. के. शेंद्रे यांनी रुग्णांची तपासणी केली. दुर्गम भागात कृष्णधवल मशीनद्वारे रुग्णांची तपासणी केली. त्यामुळे समुपदेशन करताना अनेक अडचणी येत आहेत. अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्याकरिता नवीन मशीनची मागणी जनतेकडून केली जात आहे. तपासणी करण्याकरिता महिन्यातील दुसरा व चवथा शुक्रवार असे दोन दिवस ठरविण्यात आले आहे. या तपासणीचा लाभ गर्भवती महिला व इतर महिला घेऊ शकतात.
महिलांची आरोग्य तपासणी करण्याकरिता आधुनिक मशीनचा वापर करणे आवश्यक असते. परंतु रुग्णालयात आधुनिक मशीनचा अभाव असल्याने योग्य उपचार होऊ शकत नाही. सोनोग्राफी सेवेचा लाभ घेण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन विभागातील अमित झिंगे, अधिपरिचारिका दहागावकर, महेंद्र बांदुरकर, गेमचंद गोंगले यांच्याशी संपर्क करावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)