लिपिकाची जि.प.मध्ये चौकशी

By Admin | Updated: August 26, 2016 01:10 IST2016-08-26T01:10:40+5:302016-08-26T01:10:40+5:30

२०१३ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात

Inquiry in the clerk's zip | लिपिकाची जि.प.मध्ये चौकशी

लिपिकाची जि.प.मध्ये चौकशी

बोगस बदल्यांचे प्रकरण : शिक्षण विभागाच्या फाईली तपासल्या
गडचिरोली : २०१३ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७३ बदल्यांच्या नस्त्याच गायब असल्याने या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणात शिक्षण विभागाचे लिपीक रूपेश शेडमाके यांना २४ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान गुरूवारी गडचिरोली पोलिसांनी रूपेश शेडमाके यांना गडचिरोली जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात नेऊन तेथील संपूर्ण फाईली व बदल्या संदर्भातील सर्व दस्तावेज तपासले.
जिल्हा परिषदेत पोलीस या लिपिकाला घेऊन आले असताना बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली होती. बराच काळ येथे लिपिकाची चौकशी पोलिसांनी केली. या प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, तत्कालीन पदाधिकारी व बोगस नस्त्या टाकून बदल्या करवून घेणारे शिक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. जवळजवळ तीन वर्षानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली व एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Inquiry in the clerk's zip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.