भामरागड तालुक्यातील कामांची चौकशी करा

By Admin | Updated: July 25, 2015 01:58 IST2015-07-25T01:58:18+5:302015-07-25T01:58:18+5:30

तालुक्यातील अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून या सर्व कामांची चौकशी करावी, ...

Inquiries of works in Bhamragad taluka | भामरागड तालुक्यातील कामांची चौकशी करा

भामरागड तालुक्यातील कामांची चौकशी करा

पालकमंत्र्यांना निवेदन : निधीचा दुरूपयोग
भामरागड : तालुक्यातील अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी हिंदेवाडा येथील सुधाकर लुच्चु तिम्मा यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील अनेक गावात सौरदिवे लावण्यात आले. अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. नाली, कलवट बांधकाम, स्मशानघाटाकडे जाण्याकरिता बांधलेला रस्ता, शाळेच्या इमारती संरक्षण भिंत, शौचालय, दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, शासकीय इमारतींची डागडूजी करण्यात आली. ही सर्व कामे पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर राजकीय व्यक्तींनी केली आहेत. बहुतांश बांधकामे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. मात्र या भागातील निरक्षर जनतेला याबाबत समजत नाही. त्यामुळे तक्रारही झाली नाही. पालकमंत्र्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून पोलीस यंत्रणेच्या मार्फतीने चौकशी समिती नेमावी तसेच मुख्यालयाबाबतचीही चौकशीची मागणी तिम्मा यांनी केली आहे.

Web Title: Inquiries of works in Bhamragad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.