बांधकामांची चौकशी करा

By Admin | Updated: February 9, 2015 23:14 IST2015-02-09T23:14:09+5:302015-02-09T23:14:09+5:30

तालुक्यातील नवनिर्मित पुलांच्या बांधकामांची चौकशी करणे, पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलांची त्वरित दुरूस्ती करणे तसेच तालुक्यातील शेततळ्यांच्या कामांची चौकशी करण्याच्या मुद्यावर

Inquiries of constructions | बांधकामांची चौकशी करा

बांधकामांची चौकशी करा

धानोरा : तालुक्यातील नवनिर्मित पुलांच्या बांधकामांची चौकशी करणे, पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलांची त्वरित दुरूस्ती करणे तसेच तालुक्यातील शेततळ्यांच्या कामांची चौकशी करण्याच्या मुद्यावर येथील पंचायत समितीची वार्षिक आमसभा चांगलीच गाजली. सदर बांधकामांच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली.
आमसभेला आरमोरी क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे, पं. स. सभापती कल्पना वड्डे, तहसीलदार उमकांत वैद्य, संवर्ग विकास अधिकारी पी. एस. कोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, जि. प. सदस्य मनोहर पोरेटी, पं. स. उपसभापती माया मोहुर्ले, जि. प. सदस्य सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, पं. स. सदस्य मंगला मडावी, जास्वंदा करंगामी, परसराम पदा, नामदेव शेडमाके, जयलाल मार्गीया, साईनाथ साळवे, शशीकांत साळवे, गजानन साळवे, स्वप्नील वरघंटे, गोपाल उईके, रमेश भुरसे, अनिल पोहनकर, अविनाश महाजन, कैलाश गुंडावार, विजय कुमरे, लता फुंगाटी, अजमन रावटे, दिलीप गावडे, प्रेमलाल वालको, ताराबाई कोटांगले, पोलीस निरीक्षक अवचार, महादेव गणोरकर उपस्थित होते.
प्रतिमहिना प्रतिव्यक्ती २०० मिली केरोसीन पुरवठा केला जात आहे. मात्र सदर पुरवठा अत्यल्प असल्याने एक लिटर केरोसीनमध्ये एक महिना कसा घालवायचा, असा प्रश्न सरपंच रावजी हलामी यांनी आमसभेत उपस्थित केला. तालुक्यात रेतीची तस्करी केली जात आहे. यात अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याचा आरोपही करण्यात आला. वीजपुरवठा गाडी व मनुष्यबळाअभावी सुरळीत करण्यास दमछाक होत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असल्याचा मुद्दा आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर आमसभेत समाधान व्यक्त करण्यात आले.
तालुक्यातील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, तसेच शासकीय सेवा ही लोकसेवेची संधी समजून सामान्य जनतेच्या समस्या सोडवाव्या, असे निर्देश डॉ. होळी यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीडीओ पी. एस. कोल्हे, संचालन छत्रपती मडावी तर आभार दोनाडकर यांनी मानले. यावेळी कृषी, आरोग्य, महसूल विभागासह अनेक अधिकारी व कर्मचारी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inquiries of constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.