धानोरा तालुक्यात दारूविक्रेत्यांवर धाड

By Admin | Updated: April 8, 2015 01:13 IST2015-04-08T01:13:29+5:302015-04-08T01:13:29+5:30

येथील पोलिस ठाण्यातील पोलिस व गडचिरोलीच्या दारुबंदी पथकाने अनुक्रमे माळंदा व रांगी येथे धाड घालून सुमारे दीड लाखांची विदेशी व मोहफुलाची दारु पकडली.

Injured on liquor shops in Dhanora taluka | धानोरा तालुक्यात दारूविक्रेत्यांवर धाड

धानोरा तालुक्यात दारूविक्रेत्यांवर धाड

धानोरा : येथील पोलिस ठाण्यातील पोलिस व गडचिरोलीच्या दारुबंदी पथकाने अनुक्रमे माळंदा व रांगी येथे धाड घालून सुमारे दीड लाखांची विदेशी व मोहफुलाची दारु पकडली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, तिघे जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
गडचिरोली येथील दारुबंदी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक कोळी यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आज सकाळी धानोरा तालुक्यातील रांगी येथे धाड घातली. यावेळी पोलिसांनी आनंदराव मडावी(३२)रा.मोहटोला व किशोर वालको(२८) यांना अटक केली. प्रशांत एडलावार व एक महिला फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून ७१ हजार रुपये किमतीची विदेशी व मोहफुलाची दारु आणि एक मोटारसायकल जप्त केली.
दुस?्या घटनेत धानोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव माळी यांच्या नेतृत्वात पोलिसांनी माळंदा येथे धाड घालून ८५ हजार रुपयांची विदेशी व मोहफुलाची दारु जप्त केली. याप्रकरणी मंगल कोवा(४३)रा.पवनी व वासुदेव मतलामी(५०)रा.माळंदा यांना अटक करण्यात आली, तर एक जण मोटारसायकलने फरार झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० लिटर मोहफुलाची व विदेशी दारु ताब्यात घेतली. सहायक फौजदार भेंडारे, हवालदार अलोणे, अनिल सावसाकडे, छाया पदा, कु.आलाम, उईके, सुभाष मेश्राम, तोडासे, भारद्वाज, दुगा आदींनी ही कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Injured on liquor shops in Dhanora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.