पोलिसांच्या पुढाकाराने कटेझरीत बाजार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 04:01 IST2016-01-04T04:01:05+5:302016-01-04T04:01:05+5:30

धानोरा पोलीस उपविभागातील कटेझरी परिसरातील छोटा झेलिया, मोठा झेलिया, मुरूमगाव, गुरेकसा, कोसमी,

With the initiative of the police, the market started in the cottage market | पोलिसांच्या पुढाकाराने कटेझरीत बाजार सुरू

पोलिसांच्या पुढाकाराने कटेझरीत बाजार सुरू

गडचिरोली : धानोरा पोलीस उपविभागातील कटेझरी परिसरातील छोटा झेलिया, मोठा झेलिया, मुरूमगाव, गुरेकसा, कोसमी, मर्केगाव, गॅरापत्ती आदी गावातील नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस विभागाच्या पुढाकारातून नव्या वर्षापासून कटेझरी येथे नियमित आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे.
१ जानेवारी रोजी शुक्रवारला गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी कटेझरी येथे जाऊन आठवडी बाजाराचे उद्घाटन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कटेझरी परिसरात जवळपास आठवडी बाजाराचे ठिकाण नसल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी परिसरातील नागरिकांशी चर्चा करून आठवडी बाजारासाठी कटेझरी हे केंद्रस्थान ठरविले. (प्रतिनिधी)

Web Title: With the initiative of the police, the market started in the cottage market