लसीकरण माेहीम यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST2021-05-09T04:37:55+5:302021-05-09T04:37:55+5:30

चामोर्शी तालुक्यात एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र आमगाव (म.) अंतर्गत कृष्णनगर, वालसरा, अनंतपूर, विसापूर, खोर्दा. ...

Initiative of BJP workers to make vaccination campaign a success | लसीकरण माेहीम यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा पुढाकार

लसीकरण माेहीम यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा पुढाकार

चामोर्शी तालुक्यात एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र आमगाव (म.) अंतर्गत कृष्णनगर, वालसरा, अनंतपूर, विसापूर, खोर्दा. भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लखमापूर बोरी, रामाळा, मार्कंडादेव, मुरखळा(चक), वागदरा, सगणापूर, कुनघाडा रै. आरोग्य केंद्रांतर्गत तळोधी व कुनघाडा येथे सर्व दिवस लसीकरण होईल. कोनसरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोनसरी, गणपूर, येनापूर (सर्व दिवस) जामगिरी, मर्कांडा (कं.) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ठाकरी, चौडमपल्ली, अनखोडा. घोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वरूर, सिमुलतला, नेताजिनगर, रेगडी आरोग्य केंद्रांर्गत चापलवाडा, मक्केपल्ली, ग्रामीण रुग्णालयअंतर्गत चामोर्शी व आष्टी येथे सर्व दिवस लसीकरण मोहीम सुरू राहील. लसीकरणाबाबत अडचण आल्यास नागरिकांनी भाजप चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, प्रतीक राठी, राकेश भैसारे, सुनील सोरते,प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म.) येथे विजय सातपुते, भेंडाळा येथे संजय चलाख, कुनघाडा येथे जि.प. कृषी सभापती प्रा.रमेश बारसागडे, कोनसरी येथे विनोद गौरकार, मार्कंडा येथे नंदा कुळसंगे, घोट येथे विलास उईके, रेगडी येथे सुरेश शहा, आष्टी येथे प्रकाश बोबाटे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

===Photopath===

080521\08gad_1_08052021_30.jpg

===Caption===

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. डाॅ. देवराव हाेळी.

Web Title: Initiative of BJP workers to make vaccination campaign a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.