दारूमुक्त होण्यासाठी ३० जणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:34+5:302021-02-17T04:43:34+5:30

दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना लवकरच शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. त्या रुग्णाला उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार ...

Initiative of 30 people to get rid of alcohol | दारूमुक्त होण्यासाठी ३० जणांचा पुढाकार

दारूमुक्त होण्यासाठी ३० जणांचा पुढाकार

दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना लवकरच शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. त्या रुग्णाला उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांना दारूमुक्त होण्यास मदत मिळत असते. यासाठीच मुक्तिपथ अभियानाद्वारे गाव पातळी व तालुका पातळीवर शिबिरांचे आयोजन केल्या जाते. आरमोरी शहरातील नवीन बसस्थानकाच्या मागे शिक्षक कॉलनीतील मुक्तिपथ तालुका कार्यालयात दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या १७ रुग्णांनी भेट दिली. गडचिरोली शहरातील बस डेपो जवळील मुक्तिपथ तालुका कार्यालयात १३ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतले. दोन्ही तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ३० रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आले. यावेळी दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती देत रुग्णांना समुपदेशन करण्यात आले.

Web Title: Initiative of 30 people to get rid of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.