शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:02 AM

दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवैरागड परिसरात उद्रेक : शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सुरुवातीला अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धानाची सर्वच कामे वेळेवर पूर्ण झाली. त्यामुळे धानपिकाची स्थिती चांगली होती. मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलके धानपीक निसवले आहे. मात्र पीक हातात येण्यासाठी पुन्हा एका पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकºयांकडे तलाव, बोडी आहेत, असे शेतकरी धानपिकाला पाणी देत आहेत.मागील वर्षी धान निसवण्याच्या मार्गावर असताना मावा, तुडतुडा रोगाचा प्रकोप झाला होता. निसवलेले धान करपताना शेतकºयांना बघावे लागत होते. परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे यावर्षी शेतकरी धास्तावला आहे. रोग आटोक्यात यावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके फवारली जात आहेत.जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासाकुरखेडा : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले होते. दरम्यान मोटार पंप, डिझेल इंजिनच्या माध्यमातून पाणी देऊन धान वाचविण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून केला सुरू होता. याच कालावधीत गुरूवारी व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर होऊन धानपीक डोलत होते. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक धोक्यात आले होते. हलके पीक निसवण्याच्या मार्गावर आहे. याही पिकाला पाण्याची आवश्यकता होती. नेमक्या याच वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.पिकांच्या संरक्षणासाठी साडीचे कुंपणखरीप हंगामातील अल्पमुदतीचे धानपीक आता शेवटच्या टप्प्यात आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने भरघोष उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली आहे. मात्र धानपीक लोंबावर असताना रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केला आहे.कधी नव्हे एवढा रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रोवणी झाल्यानंतर धानपीक पालवीला आल्यापासूनच रानडुकरांकडून धानपिकाची नासाडी सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, करपडा, कोजबी, गणेशपूर, सिर्सी आदी गावातील शेतकऱ्यांची रानडुकर हैदोसाबाबत ओरड सुरू आहे. वन्यजिवांकडून होणाºया नुकसानीबद्दल शेतकºयांनी वैरागडचे क्षेत्रसहायक, वनरक्षक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली. मात्र रानडुकर बंदोबस्ताची वन विभागाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. अशा स्थितीत साड्यांपासून कुंपण बनवून अनेक शेतकरी आपल्या धानपिकाचे संरक्षण करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती