स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव पारित
By Admin | Updated: May 3, 2016 01:49 IST2016-05-03T01:49:43+5:302016-05-03T01:49:43+5:30
चामोर्शी तालुक्यातील घोट ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिनी १ मे रोजी रविवारला ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत

स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव पारित
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिनी १ मे रोजी रविवारला ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत स्वतंत्र विदर्भ राज्यासह घोट तालुक्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, ग्रा.पं. सदस्य अकपटेलवार, कवडू भोवरे, संजय वडेट्टीवार, परशुराम दुधबावरे, ग्रा.पं. सचिव वाय. जी. म्हस्के, ढिवरू बारसागडे, बाबुराव भोवरे, पोलीस पाटील हरिदास चलाख, तंमुस अध्यक्ष रमेश दुधबावरे आदी उपस्थित होते.
यावेळी १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधी खर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामविकास आराखडा तयार करून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी ग्रामसभेत केली. (वार्ताहर)