स्वतंत्र विदर्भ, अहेरी जिल्हा, नव्या तालुक्यांच्या मागणीसाठी धरणे

By Admin | Updated: December 14, 2015 01:41 IST2015-12-14T01:41:43+5:302015-12-14T01:41:43+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून अहेरी जिल्ह्यासह जारावंडी, जिमलगट्टा, आसरअल्ली, कमलापूर, पेरमिली व गट्टा हे सहा नवे तालुके घोषित करण्यात यावे,

Independent Vidarbha, Aheri District, Demand for new Taluka dam | स्वतंत्र विदर्भ, अहेरी जिल्हा, नव्या तालुक्यांच्या मागणीसाठी धरणे

स्वतंत्र विदर्भ, अहेरी जिल्हा, नव्या तालुक्यांच्या मागणीसाठी धरणे

सुभाषनगर फाटा येथे आंदोलन : अहेरी जिल्हा कृती समितीचा पुढाकार
अहेरी : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून अहेरी जिल्ह्यासह जारावंडी, जिमलगट्टा, आसरअल्ली, कमलापूर, पेरमिली व गट्टा हे सहा नवे तालुके घोषित करण्यात यावे, या मागणीला घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने रविवारी तालुक्यातील सुभाषनगर फाटा येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भासह अहेरी जिल्ह्याची निर्मिती तत्काळ करा, अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर अहेरीचे तहसीलदार आर. पुप्पलवार यांनी आंदोलनस्थळी सुभाषनगर फाटा येथे येऊन कृती समितीच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. यावेळी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, अतुल उईके, अजय गोवंशी, प्रणय नागसरे, महेश सिडाम, दीपक सडमेक, माधव मांडरे, गणपत पोरेड्डीवार, संतोष चरडे, रमेश मुद्रकोलवार, प्रदीप चौधरी, हिराजी डोके, नामदेव नागुलवार, आबाजी चौधरी आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
स्वाक्षरी मोहीमही राबविली
गडचिरोली जिल्ह्याचे मोठे भौगोलिक क्षेत्र, जिल्हा मुख्यालयाचे अंतर मोठे असल्याने नियोजनाअभावी अहेरी उपविभागाचा विकास रखडला आहे. स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण केल्यास विकासाला चालना मिळेल. अशा आशयाचे तब्बल पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

Web Title: Independent Vidarbha, Aheri District, Demand for new Taluka dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.