रेती तस्करीसाठी वैनगंगा नदीवर तयार केला स्वतंत्र घाट

By Admin | Updated: May 16, 2017 00:42 IST2017-05-16T00:42:00+5:302017-05-16T00:42:00+5:30

देसाईगंज शहरातील रेती तस्करांनी कुरूड गावाजवळ वैनगंगा नदी पात्रातून रेतीचा उपसा तयार करण्यासाठी स्वतंत्र रेती घाट तयार केला आहे...

An independent Ghat built on Wainganga river for smuggling of sand | रेती तस्करीसाठी वैनगंगा नदीवर तयार केला स्वतंत्र घाट

रेती तस्करीसाठी वैनगंगा नदीवर तयार केला स्वतंत्र घाट

कोट्यवधींचा चुना : कुरूड येथून अवैध वाहतूक वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज शहरातील रेती तस्करांनी कुरूड गावाजवळ वैनगंगा नदी पात्रातून रेतीचा उपसा तयार करण्यासाठी स्वतंत्र रेती घाट तयार केला आहे व या रेती घाटातून दरदिवशी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेकडो ट्रॅक्टर रेतीचा उपसा केला जात आहे. यामुळे शासनाला कोट्यवधी रूपयांचा भूर्दंड बसत आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
देसाईगंज तालुक्यात एकूण सहा रेती घाट आहेत. त्यापैकी तीन रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. या तीन रेती घाटातून शासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळाला आहे. एखाद्या घाटाचा लिलाव न झाल्यास त्या घाटातून रेतीची तस्करी केली जात असल्याच्या घटना राज्यभरात नेहमी घडतात. मात्र देसाईगंज येथील रेती तस्करांनी एकत्र येत स्वतंत्र रेती घाटच तयार केला आहे. या रेती घाटातून रात्रीच्या सुमारास खुलेआम रेतीची तस्करी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. याबाबतची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. रेती तस्करांनी नदी पात्रात मोठमोठे खड्डे तयार केले आहेत. या रेती तस्करांनी बनावट रॉयल्टी बूकही छापले आहे.

देसाईगंज येथे रूजू होऊन केवळ एक महिन्याचा कालावधी झाला आहे. कुरूड घाटातून रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास महसूल निरिक्षक व दोन तलाठ्यांना घेऊन अवैध उपसा घाटाकडे गेलो होतो. मात्र रस्ता चुकल्याने रेती तस्कर ट्रॅक्टर घेऊन पसार झाले.
-टी. डी. सोनवाने, तहसीलदार देसाईगंज

Web Title: An independent Ghat built on Wainganga river for smuggling of sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.