पैसे काढण्यासाठी जिल्हाभरातील बँकांमध्ये वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:25+5:30

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना बेरोजगारीची झळ सहन करावी लागली. या नागरिकांना दिलासा म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जनधन खात्यामध्ये ५०० रुपये टाकण्यात आले. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे गॅस सिलिंडर कनेक्शन आहेत,

Increased crowds at banks across the district to withdraw money | पैसे काढण्यासाठी जिल्हाभरातील बँकांमध्ये वाढली गर्दी

पैसे काढण्यासाठी जिल्हाभरातील बँकांमध्ये वाढली गर्दी

ठळक मुद्देवृद्ध व शेतकऱ्यांची संख्या अधिक : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत नागरिकांच्या खात्यांमध्ये पैसे टाकण्यास सुरूवात झाली आहे. सदर पैसे काढण्यासाठी जिल्हाभरातील बँकांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी सोमवारी गर्दी केली होती.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना बेरोजगारीची झळ सहन करावी लागली. या नागरिकांना दिलासा म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जनधन खात्यामध्ये ५०० रुपये टाकण्यात आले. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे गॅस सिलिंडर कनेक्शन आहेत, अशा नागरिकांच्या बँक खात्यामध्ये ७९० रुपये टाकले जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचे अनुदानही जमा करण्यात आले आहे. तसेच निराधार व्यक्तींच्या खात्यांमध्येही प्राधान्याने १ हजार रुपये जमा केले जात आहेत. सदर पैसे काढण्यासाठी सोमवारी गडचिरोली शहरातील विविध बँका तसेच जिल्हाभरातील इतरही बँकांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.
गर्दीमुळे काही बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन केले जात होते. मात्र बँकेने सावलीची केलेली व्यवस्था अपुरी पडत असल्याने नागरिकांना सावलीचा आधार घेऊन सावलीतच गर्दी करून राहावे लागत होते. बँकेच्या कार्यालयात मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.

बँक मित्रामुळे गर्दी कमी होण्यास मदत
ज्या नागरिकांचे बँक खाते आधारशी संलग्नित आहेत. तसेच त्यांना २० हजार पेक्षा कमी रक्कम काढायची असेल तर अशा ग्राहकांसाठी बँक आॅफ इंडिया गडचिरोली येथे बँक मित्राची नियुक्ती केली आहे. त्यामुळे बँकेतील गर्दी कमी होण्यास मदत झाली. विड्रॉलचा अर्ज करून थंब घेतल्यानंतर पैसे दिले जात होते. मात्र काही ग्राहकांची बँक खाती आधारशी संलग्नित नसल्याने अशा नागरिकांना बँकेतच जाऊन पैसे काढावे लागत होते.

Web Title: Increased crowds at banks across the district to withdraw money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक