शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

शहरी लाेकांकडून वाढली ताडीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या देशी-विदेशी आणि माेहफूल दारूच्या विक्रीला आता ताडीची साथ मिळाली आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या देशी-विदेशी आणि माेहफूल दारूच्या विक्रीला आता ताडीची साथ मिळाली आहे. दारूपेक्षाही दुर्गम भागातील अस्सल ताडी म्हणून शहरी भागातील लाेकांची माेठी पसंती आहे. दुर्गम भागातून कॅन तसेच बाटल्यांमध्ये ताडीची शहरी भागात आयात हाेत आहे. ताडी विक्रीतून एटापल्लीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना मोठा राेजगार मिळत आहे.

अहेरी उपविभागात ताडाच्या झाडांची संख्या माेठी आहे. एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर, ताेडसा परिसरात राहणारे आदिवासी व बिगर आदिवासी नागरिक जंगलात जाऊन झाडापासून ताडी काढतात. ही ताडी रस्त्यालगत तसेच चाैकाचाैकात विकल्या जाते. विशेष म्हणजे, शासनाच्या सर्वच विभागातील कर्मचारी यात ताडीची आवर्जुन खरेदी करतात. आराेग्यासाठी अतिशय लाभदायक व गुणकारी असलेल्या ताडीला गेल्या १५ ते २० दिवसांपासून मागणी वाढली आहे. अहेरी उपविभागासह काेरची तालुक्यात तसेच धानाेरा तालुक्यात अस्सल ताडी नागरिकांना प्राप्त हाेत आहे. ताडीविक्रीला शासनाकडून कायद्याने सध्यातरी परवानगी नाही. जिल्ह्यात एकही नाेंदणीकृत परवानाप्राप्त ताडीचे दुकान नाही. मात्र, १७ ऑक्टाेबर २००२ च्या न्यायालयाच्या आदेशानुसार, ताडीच्या दुकानाला परवाना देण्यासाठी निर्णय घेण्यासंदर्भात नवी शिफारस लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या निर्देशानुसार ताडीची विक्री करण्यासाठी दुकानाला रितसर परवानगी देऊन त्याचे नूतनीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे ताडीच्या दुकानांना परवाना प्राप्त करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने १० जणांची समिती गठीत केल्याची माहिती आहे.

बाॅक्स....

पावडर मिश्रित ताडी आराेग्यासाठी घातक

गडचिराेली जिल्हा मुख्यालय तसेच चामाेर्शी, आरमाेरी, देसाईगंज या तालुकास्थळी येऊन काही लाेक पावडर मिश्रित ताडीची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आहे. गडचिराेली येथील गांधी चाैक तसेच मुख्य मार्गावर अशा प्रकारची ताडी विकल्या जाते. खरपुंडी नाक्याजवळ तसेच मार्गावर अनेक ठिकाणी विकली जात आहे. चांदाळा परिसरातही अशा प्रकारच्या ताडीची विक्री केली जात आहे. पावडर मिश्रित ताडी आराेग्यासाठी घातक ठरू शकते.