सिंचनाची व्याप्ती गतीने वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:47 IST2018-04-19T23:47:22+5:302018-04-19T23:47:22+5:30
शेतकऱ्यांसाठी पुरेशी सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास शेती सुजलाम, सुफलाम होईल यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सिंचन योजनेच्या कामांना गती द्यावी, लोकसभा क्षेत्रात सिंचनाची व्याप्ती वाढवा, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सिंचनाची व्याप्ती गतीने वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांसाठी पुरेशी सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास शेती सुजलाम, सुफलाम होईल यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सिंचन योजनेच्या कामांना गती द्यावी, लोकसभा क्षेत्रात सिंचनाची व्याप्ती वाढवा, असे निर्देश खा.अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंगळवारी नागपूर येथील सिंचन सेवा भवनात खा. नेते यांनी सिंचन विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. सदर आढावा बैठकीत सिंचनविषयक विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने चिमूर क्षेत्राचे आ. कीर्तिकुमार भांगडिया, माजी आ. अतुल देशकर, भाजपच्या किसान संघाचे विदर्भ महामंत्री उदय बोरावार, चंद्रपूरचे जि.प. सदस्य संजय गजपुरे, होमदेव मेश्राम, ईश्वर कामडी, अविनाश पाल, विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे आदी उपस्थित होते.
वैनगंगा नदीच्या उपनद्यांवर बंधारे बांधण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू असून बांडिया नदीवरील पैडी व पोहार नदीवरील चितेकनार व ठाकरी, सती नदीवरील अरततोंडी, कठाणी नदीवरील आंबेशिवणी, पोहार नदीवरील पोटेगाव, जयसिंगटोला, बोरिया नदीवरील गव्हाळहेटी, पोटफोडी नदीवरील राणमुल व कुंभी, गाढवी नदीवरील किन्हाळा असे १२ बंधारे निधीसाठी शासनस्तरावर प्रलंबित आहे, अशी माहिती चंद्रपूर येथील जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता गोन्नाडे यांनी दिली. घोट, रेगडी परिसरातील १४ गावांच्या सिंचनाची समस्या मार्गी लावण्यासाठी वनजमिनीचा अडथळा येत असून त्यावर पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे, असे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.