सरपंचांच्या मानधनात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:07 IST2018-03-18T00:07:06+5:302018-03-18T00:07:06+5:30
नक्षलग्रस्त आदिवासी बहूल भागात काम करताना सरपंचांना काम करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीतही गाव विकासाचे कामे करीत आहेत. मात्र अत्यल्प मानधनामुळे काही सरपंचांचे मनोबल खचले आहे.

सरपंचांच्या मानधनात वाढ करा
ऑनलाईन लोकमत
एटापल्ली : नक्षलग्रस्त आदिवासी बहूल भागात काम करताना सरपंचांना काम करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीतही गाव विकासाचे कामे करीत आहेत. मात्र अत्यल्प मानधनामुळे काही सरपंचांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा संघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जि.प. मध्ये येऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शालिक धनकर यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश नाकतोडे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत आत्राम, महिला उपाध्यक्ष ममता बिश्वास, संपर्क प्रमुख प्रशांत किलनाके, सरपंच राजू बुरले, हालेवाराचे सरपंच वासुदेव गेडाम यांच्यासह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी आदीसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील सरपंच सेवा संघाचे सदस्य हजर होते.