शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

चामोर्शी तालुक्यात नीलगिरी लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

 नीलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारी झाडे असल्याने एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात या झाडाचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय सर्व प्रकारच्या जमिनीत हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत नीलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवाराच्या परिसरात झाडाची लागवड केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी वळले वनशेतीकडे, आर्थिक उत्पन्नासाठी बदलविले पीक; कृषी विभागाचे मार्गदर्शन

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : खडकाळ, कोरडवाहू शेतजमिनी तसेच मजगीच्या पाळीवर, शेतातील पाड्यावर निलगिरीचे झाडे लावून त्यातून अधिकाधिक उत्पन्न घेण्याकडे चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.  तालुक्याच्या कळमगाव, एकोडी, नवेगाव माल, फोकुर्डी, भेंडाळा, मुरखळा, चाकलपेठ, नागपूर चक आदी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नीलगिरीची झाडे लावल्याने त्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळण्याची आशा आहे. नीलगिरी बहुगुणी, बहुउपयोगी आणि जलद वाढणारी झाडे असल्याने एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात या झाडाचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय सर्व प्रकारच्या जमिनीत हे झाड वाढत असल्याने सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत नीलगिरीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवाराच्या परिसरात झाडाची लागवड केली जात आहे. नीलगिरीच्या झाडाचा लाकूड-फाटा ही एक सलग वाढत असल्याने इमारतीसाठी उपयोगी पडतो. झाडांना बाजारपेठेत वाजवी दर मिळते. नीलगिरीचे झाड उन्हाळ्यात पूर्णत वाढते म्हणजे नवी पाने येण्यापूर्वी त्यांच्या वजनात एक-तृतीयांश घट येते व ते एक चांगले इंधन म्हणूनही वापरता येते.       नीलगिरीच्या झाडापासून कागद निर्मितीही केली जाते. या झाडाची साल किंवा बुंध्यातून पाझरणाऱ्या स्रावामुळे कातडी कमविण्यास लागणारे टॅनिनसारखे द्रव्य ही मिळते. निलगिरीच्या झाडातील विविध प्रकारचे गुणधर्म व उपयोग लक्षात घेऊन या झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर झाडाची चांगली किमत मिळत असल्याने विक्री केली जाते. त्यामुळे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून नीलगिरी वृक्षाची लागवड करण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  तालुक्यासह परिसरातील अनेक गावात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नीलगिरीची लागवड केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात अनेक ठिकाणी नीलगिरीचे झाड शेतशिवारात दिसून येत आहे. नीलगिरीचे लाकूड अतिशय मजबूत असल्याने याला माेठी मागणी आहे. कमी खर्चाची व कमी धाेक्याची ही शेती शेतकऱ्यांना सध्याच्या स्थितीत परवडणारी आहे. नीलगिरी लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणे गरजेचे आहे. तशी मागणी हाेत आहे. 

 हे आहेत औषधी गुणधर्म नीलगिरीच्या झाडाचा औषधी गुणधर्म असलेले कॅलरी पिक मूल्य कमीत कमी चार हजार सातशे ते ४८०० कॅलरीज प्रति किलोग्राम असतात औषध कंपन्या तसेच आयुर्वेदिक कंपन्यांकडूनही झाडांना मोठी मागणी असते. पाने तसेच कोवळ्या फांद्यापासून नीलगिरीचे तेल काढले जाते. याचा वापर औषधी, औद्योगिक व सुगंधी तेल निर्मितीसाठी केला जातो. तसेच नीलगिरीचे लाकूड औद्योगिक उपयोगासाठी व ७० प्रकारचे तेल औषधासाठी वापरले जाते. नीलगिरीच्या तेलात सिनीओल जास्त असल्याने यापासून साबण स्प्रे व औषधी गोळ्याही तयार केले जातात. गडचिराेली जिल्हा हा धान उत्पादकाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यातील शेतकरी आता साेयाबिन, कापूस व नीलगिरी आदी पिकांकडे वळला आहे.  या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभत आहे. 

कोरडवाहू शेतजमिनीत गेल्या सात - आठ वर्षापासून निलगिरी लागवड केली आहे. झाडे उंच झाल्यामुळे इतरही पीक निलगिरी वनशेतीत घेता येते. मात्र स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध नसल्याने परजिल्हातील व्यापारी येऊन निलगिरीचे लाकूड खरेदी करून नेत असतात. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.   - पुरुषोत्तम राऊत, शेतकरी मुरखळा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती