भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करा
By Admin | Updated: August 3, 2015 01:01 IST2015-08-03T01:01:08+5:302015-08-03T01:01:08+5:30
भाट समाज अद्यापही विकासापासून वंचित आहे. भाट समाजाच्या उत्थानासाठी शासनाने भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करून समाजाला सोयीसवलती द्याव्यात, ...

भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करा
गडचिरोलीत बैठक : विनायक सूर्यवंशी यांची मागणी
गडचिरोली : भाट समाज अद्यापही विकासापासून वंचित आहे. भाट समाजाच्या उत्थानासाठी शासनाने भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करून समाजाला सोयीसवलती द्याव्यात, अशी मागणी भाट समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक सूर्यवंशी यांनी केली.
अखिल भारतीय भाट समाजाची बैठक रविवारी प्रेसक्लब भवनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार केशव दशमुखे होते. प्रमुख अतिथी म्हणून सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, प्रेमराज सूर्यवंशी, विजय खडतकर, ज्योती निचड, रिमा ठाकूर, संतोष सूर्यवंशी, विजय वानखेडे, शारदा सूर्यवंशी, मधुकर खडतकर, भगवान इंगळे, फाल्गुन निथाणे, डॉ. नंदाजी जरूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाट समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ११ आॅक्टोबर हा स्मृतीदिन पाळण्यात यावा या मागण्यांसाठी नागपूर येथे होणाऱ्या मेळाव्यात समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील भाट समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी समाजाच्या वतीने सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी, अॅड. अविनाश खडतकर, शंकर इंगळे, विलास दशमुखे, कांचन दशमुखे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास दशमुखे यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्रमोद दशमुखे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)