कळमटाेलात व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST2021-02-05T08:54:15+5:302021-02-05T08:54:15+5:30

गडचिरोली : तालुक्यातील कळमटोला येथे चार्ली व्हाॅलीबाॅल क्लबच्या वतीने व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना ...

Inauguration of volleyball tournament in Kalamatal | कळमटाेलात व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

कळमटाेलात व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

गडचिरोली : तालुक्यातील कळमटोला येथे चार्ली व्हाॅलीबाॅल क्लबच्या वतीने व्हाॅलिबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते २९ जानेवारीला पार पडले. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा, असे प्रतिपादन अरविंद कात्रटवार यांनी केले. याप्रसंगी रंजना गुरनुले, राहुल ठाकरे, प्रेमिला सहारे, मंगेश सहारे, यादव करकाडे, रवींद्र ठाकरे, रामचंद्र ढोरे, अरुण वेलादी, मनीषा उंदीरवाडे, रूपाली मुरतेली, अजय ढोरे, रूपेश ठाकरे, किरणदास ढोणे, पुरषोत्तम कोरेते, गणेश ठाकरे, राकेश गजबे, महेश करकाडे, प्रवीण कोलते, रोशन निकुरे, अरविंद ठाकरे, अनिल मुरतेली, मनोज ढोने, दीपक ठाकरे, नीलेश ठाकरे, मनीष सहारे, देवराव मुरतेली, दिलीप कोलते आदी उपस्थित हाेते.

Web Title: Inauguration of volleyball tournament in Kalamatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.