राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

By Admin | Updated: November 8, 2014 01:17 IST2014-11-08T01:17:37+5:302014-11-08T01:17:37+5:30

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन संलग्नित गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने आज शुक्रवारी....

Inauguration of state-level volleyball competition | राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन संलग्नित गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने आज शुक्रवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर १७ व्या युथ व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी उद्घाटक म्हणून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष निर्मला मडके होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, न. प. बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, शिक्षण सभापती सचिन बोबाटे, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी, माजी प्राचार्य भैयासाहेब ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव दादाजी चापले, रेफरी बोर्डाचे चेअरमन साहेबराव ठाकरे, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे लातून विभागाचे सचिव मनिपत पाळणे, सहसचिव रतन लिगाडे, कोषाध्यक्ष सुनिल हांडे, औरंगाबाद विभागाचे सचिव हर्षद काझी, रेफरी बोर्डाचे निमंत्रक पी. एस. पंथ, राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे संघटक गजानन जीवतोडे, उपाध्यक्ष श्रीनिवासन सतुरवार, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, माणिक भूडे, यशोधरा उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून व प्रतिमा पूजनाने रितसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी आ. डॉ. उसेंडी, भैयासाहेब ठाकरे, नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी यांनी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अटी व नियमाबद्दल सविस्तर माहिती दिली. उद्घाटनिय कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे नागपूर विभागीय सचिव सतिश पवार, संचालन व आभार अजय लोंढे यांनी मानले. याप्रसंगी सहभागी खेळाडूंना खिलाडूवृत्ती बाळगण्याची शपथ देण्यात आली. त्यानंतर उद्घाटनिय मुलांचा पहिला सामना नागपूर विरूद्ध पुणे व मुलींचा अमरावती विरूद्ध नाशिक या संघात घेण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of state-level volleyball competition