उपजिल्हा रुग्णालयात आयसीयूचे उद्घाटन
By Admin | Updated: April 16, 2016 01:16 IST2016-04-16T01:16:34+5:302016-04-16T01:16:34+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे निमित्त साधून येथील उपजिल्हा रूग्णालयात अदानी फाऊंडेशनच्या सीएसआर ....

उपजिल्हा रुग्णालयात आयसीयूचे उद्घाटन
तिरोडा : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे निमित्त साधून येथील उपजिल्हा रूग्णालयात अदानी फाऊंडेशनच्या सीएसआर निधीतून व आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन आमदार रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी, राज्य शासन हा सप्ताह रौप्य सप्ताह म्हणून साजरा करीत असतानाच जगात संयुक्त राष्ट्र संघ पहिल्यांदाच बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत असल्याचे सांगीतले.
विशेष म्हणजे मागील वर्षी मागील वर्षी बाबासाहेबांच्या जयंती दिनी रूग्णालयात सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार रहांगडाले यांनी अतिदक्षता विभागाची घोषणा केली होती व त्याची पूर्तता यंदा बाबासाहेबांच्या जयंती दिनी केली.
याप्रसंगी माजी आमदार भजनदास वैद्य, हरीश मोरे, बाजार समिती प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, डॉ. वसंत भगत, संजय बैस, अदानीचे सुबोध सिंग, उमाकांत हारोडे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहर अध्यक्ष सलाम शेख, महामंत्री तेजराम चव्हाण, सुनील येरपूडे, पिंटू रहांगडाले, अनुप बोपचे, डॉ. हिम्मत मेश्राम यांच्यासह रूग्णालयात सर्व डॉक्टर्स, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)