कृषी सहायक याेगेश बाेरकर यांना निराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:50+5:302021-09-25T04:39:50+5:30

शिवराजपुर मध्ये निरोप समारंभ कार्यक्रम कुरूड : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर साजामध्ये कार्यरत कृषी सहायक योगेश बोरकर यांची बदली झाल्याने ...

Inauguration of Agriculture Assistant Yagesh Baerkar | कृषी सहायक याेगेश बाेरकर यांना निराेप

कृषी सहायक याेगेश बाेरकर यांना निराेप

शिवराजपुर मध्ये निरोप समारंभ कार्यक्रम

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर साजामध्ये कार्यरत कृषी सहायक योगेश बोरकर यांची बदली झाल्याने त्यांना गावकऱ्यांकडून निराेप देण्यात आला. बोरकर यांनी सेवाकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. गावकऱ्यांच्या वतीने बाेरकर यांचा शाल, श्रीफळ व महात्मा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंजचे उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश गेडाम, मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम, पर्यवेक्षक भूषण देशमुख, नवनियुक्त कृषी सहायक श्रीकांत ठवरे, लोकमान्य बरडे, दिनेश बेदरे, कृषिमित्र संतोष दिघोरे, संजय कुथे, अन्नाजी कुथे, दिनेश कुथे, बचत गटाच्या महिला व शेतकरी उपस्थित हाेते.

Web Title: Inauguration of Agriculture Assistant Yagesh Baerkar