अ‍ॅक्टिव्ह रुग्णांनी पार केला ५०० चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:00 AM2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:34+5:30

जिल्ह्यात बुधवारी निघालेल्या ७० कोरोनारुग्णांपैकी ३७ जण गडचिरोली शहरातील आहेत. सामाजिक संसर्गातून त्यांना बाधा झाली असल्यामुळे नाक-तोंडावर मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता अशा ग्राहकांना कोणीही दुकानदाराने आपल्या दुकानात प्रवेश देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी प्रसिद्धी पत्रकातून दिला.

Inactive patients crossed the 500 mark | अ‍ॅक्टिव्ह रुग्णांनी पार केला ५०० चा टप्पा

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांनी पार केला ५०० चा टप्पा

Next
ठळक मुद्देनवीन ७० जण पॉझिटिव्ह : आतापर्यंत १७८२ पैकी १२६९ जण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आतापर्यंत १७८२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. पण त्यापैकी सद्यस्थितीत ५०६ जण आजच्या स्थितीत क्रियाशिल (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण झाले आहेत. क्रियाशिल रुग्णांचा आकडा जिल्ह्यात पहिल्यांदाच ५०० च्या वर गेल्याने हा जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.
बुधवारी ७० नवीन कोरोना पॉझिटिव्हची भर पडली तर १८ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण बाधित १७८२ रुग्णांपैकी १२६९ जणांनी कोरोनावर मात केली तर मृतांचा आकडा दोन दिवसात वाढला नसून तो ७ वर कायम आहे.
नवीन ७० बाधितांमध्ये गडचिरोलीतील ३७ जणांचा समावेश आहे. यात इंदिरानगर १, सुभाष वार्ड १, कलेक्टर कॉलनी १, जिल्हा न्यायालय १, रेड्डी गोडाऊन २, विवेकानंद नगर १, बुद्ध विहार कॉम्लेक्स जवळ १, हनुमान नगर १, कॅम्प भागात १, गोकुळनगर २, मेडिकल कॉलनी १, साई नगर बसेरा कॉलनी १, कॉम्लेम्क्स २, सोनापूर १, सुयोग नगर १, गीलगाव १, गणेश कॉलनी १, एचपी गॅस गोडाऊनजवळ १, कारगिल चौक १, मुरखडा ३, पोलीस संकुल २, कोटगल १, पंचवटीनगर १, वनश्री कॉलनी १, चंद्रपूरचे २ असे ३७ जण आज गडचिरोलीत बाधित झाले आहेत.
याशिवाय देसाईगंज येथील १९, चामोर्शी येथील वेगवेगळ्या वार्डातील ७, आरमोरी ३, कुरखेडा २, धानोरा, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा प्रत्येकी एक-एक असे मिळून ७० नवीन कोरोनाबाधित आढळून आले.
आज १८ कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १०, चामोर्शी १ , कोरची २, आरमोरीतील ५ जणांचा समावेश आहे. गडचिरोलीनंतर सर्वाधिक रुग्ण अनुक्रमे चामोर्शी, धानोरा, अहेरी आणि त्यानंतर देसाईगंजमध्ये आढळले आहेत.

विनामास्क ग्राहक दिसल्यास दुकानदारांवर होणार कारवाई
जिल्ह्यात बुधवारी निघालेल्या ७० कोरोनारुग्णांपैकी ३७ जण गडचिरोली शहरातील आहेत. सामाजिक संसर्गातून त्यांना बाधा झाली असल्यामुळे नाक-तोंडावर मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता अशा ग्राहकांना कोणीही दुकानदाराने आपल्या दुकानात प्रवेश देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी प्रसिद्धी पत्रकातून दिला.

जनता कर्फ्यूची मागणी वाढली
जिल्ह्याच्या अनेक भागात वाढत असलेली कोरोनारुग्णांची संख्या पाहता काही दिवस जनता कर्फ्यू करावा अशी मागणी वाढत आहे. काही लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनीही जनता कर्फ्यूला समर्थन देत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र बुधवारीसुद्धा याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता.

Web Title: Inactive patients crossed the 500 mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.