शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'एकलव्य'मध्ये अधीक्षकाकडून विद्यार्थ्यांना चप्पलेने मारहाण; अहेरीतील संतापजनक प्रकार

By संजय तिपाले | Updated: March 27, 2025 18:49 IST

Gadchiroli : आदिवासी संघटनांचा आक्रमक पवित्रा

गडचिरोली : अहेरीत तीन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना चप्पलेने मारहाण केली. चार ते पाच विद्यार्थ्यांनी याबाबत नातेवाईकांना कळविल्यानंतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी २७ रोजी एकलव्य स्कूलमध्ये धाव घेत या प्रकरणाला वाचा फोडली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य मॉडेल निवासी स्कूल चालविले जातात. यानुसार अहेरीत देखील हे स्कूल असून तेथे सातशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान, २५ मार्च रोजी दुपारी जेवणानंतर काही मुले आपल्या खोलीत जाऊन झोपली होती. यावेळी वसतिगृह अधीक्षक ईश्वर शेवाळे याने त्यांना काठीने व चप्पलेने मारहाण केली. यानंतर एका विद्यार्थ्यास अभ्यास करताना स्टडी रुममध्ये झोप लागली. त्याला देखील चप्पला व काठीचा मार देण्यात आला, अशा आशयाच्या तक्रारीने एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा कसा छळ सुरु होता, हे समोर आले आहे. यांसदर्भात अहेरीचे उपविभागीय अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांना संपर्क केला त्यांनी कॉल घेतला नाही. त्यामुळे प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रकल्प अधिकाऱ्यांची भेटया घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष नागेश मडावी व इतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एकलव्य स्कूलमध्ये सुरु असलेल्या अधीक्षकाच्या मनमानीचा पाढा वाचून दाखविला. अधीक्षक ईश्वर शेवाळे याच्यावर गुन्हा नोंदवून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. 

फोनवरुन हुंदके देत सांगितली आपबिती२५ मार्चची घटना २७ रोजी समोर आली. स्कूल निवासी असल्याने खूप बंधने आहेत, त्यामुळे या घटनेची कोणीच वाच्यता करणार नाही, असा अधीक्षक ईश्वर शेवाळेचा भ्रम होता, पण एका विद्यार्थ्यांने गुपचूप आपल्या नातेवाईकास फोन करुन हुंदके देत आपबिती सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना कळवले , त्यानंतर त्यांनी वसतिगृहात जाऊन जाब विचारला.

विद्यार्थी दहशतीतएकलव्य मॉडेल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधीक्षक ईश्वर शेवाळे हा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करत होता. मात्र, त्याच्या दहशतीमुळे विद्यार्थी कुठे याबाबत ब्र शब्द काढत नव्हते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पायावर केलेल्या मारहाणीचे फोटो समाजमाध्यमात प्रसारित झाले, त्यानंतर सर्वस्तरातून रोष व्यक्त करण्यात आला. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीSchoolशाळाEducationशिक्षण