शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

२००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

By संजय तिपाले | Updated: November 7, 2023 17:02 IST

काही जण सिनेमाप्रमाणे ग्लिसरीन लावून रडतात

गडचिरोली : विकासाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ९० टक्के आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, पण काही जण विचारधारेविरुद्ध निर्णय घेतल्याचे सांगून सिनेमात जसे ग्लिसरीन लावून रडतात तसे काही जण रडत आहेत, अशी खरमरीत टीका प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी केली.  २००९ मध्येच लोकसभा निवडणुकीला भाजपसोबत युतीची चर्चा राष्ट्रवादीत झाली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळावा ७ नोव्हेंबरला शहरातील चंद्रपूर रोडवरील एका लॉन्समध्ये झाला. यानंतर सुनील तटकरे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या सदस्या आबा पांडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर उपस्थित होते.

यावेळी तटकरे म्हणाले, भाजपसोबत युतीच्या चर्चा २००९, २०१४, २०१९ मध्येही झाल्या, पण त्यावर निर्णय का होऊ शकला नाही. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात, त्याचाच एक भाग म्हणून सर्वांच्या संमतीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार, शेतकरी , महिलांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यास ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर यश मिळवले आहे. यामुळे जनमत अजित पवार यांच्यासोबतच आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा दावा त्यांनी केला. लोकसभेला राज्यात महायुती ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करुन आगामी विधानसभा निवडणूकही एकत्रितच लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध

सकल मराठा समाजाने राज्यात यापूर्वी आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबध्द असल्याचे सुनील तटकरे म्हणाले. विशेष म्हणजे कालमर्यादेत व टिकणारे आरक्षण द्यायचे असून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे याकरता प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेGadchiroliगडचिरोलीBJPभाजपा