मारहाण करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:40 AM2021-01-16T04:40:59+5:302021-01-16T04:40:59+5:30

सुधाकर याने तक्रारकर्ती जनाबाई धाेंडू कुमाेटी यांच्या घरावर २५ एप्रिल २०१९ राेजी रात्री १ वाजता गाेटे फेकून मारले. ...

Imprisonment for beating | मारहाण करणाऱ्यास कारावास

मारहाण करणाऱ्यास कारावास

Next

सुधाकर याने तक्रारकर्ती जनाबाई धाेंडू कुमाेटी यांच्या घरावर २५ एप्रिल २०१९ राेजी रात्री १ वाजता गाेटे फेकून मारले. त्यावेळी जनाबाई ही बाहेरगावी गेली हाेती. तर तिची सून व मुलगा हे अंगणात झाेपले हाेते. सुधाकरने जनाबाईची सून मंदाबाईवर लाेखंडी सुरीने वार करून जखमी केले. याबाबतच्या तक्रारीवरून १ मे २०१९ राेजी सुधाकर कुमरे याच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे. १ जुलै राेजी त्याला अटक करून प्रकरण न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने साक्षीदारांचे बयान नाेंदविले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. खटी यांनी आराेपीला कलम ३०७ अन्वये दाेषी ठरवून चार वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. एस. यू. कुंभारे यांनी बाजू मांडली.

Web Title: Imprisonment for beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.