१५ वर्षांपूर्वीच्या गैरव्यवहारात १३ आराेपींना कारावास व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST2022-04-02T05:00:00+5:302022-04-02T05:00:27+5:30
१ एप्रिल १९९५ ते ३१ मार्च २००६ या कालावधीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कामकाजात गैरव्यवहार केला. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक अरुण गंगाधर मुद्देशवार यांनी ३१ मे २००७ राेजी गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली हाेती. पाेलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांच्या नेतृत्वात तपास करण्यात आला. त्यांच्याविराेधात न्यायालयात खटला दाखल केला.

१५ वर्षांपूर्वीच्या गैरव्यवहारात १३ आराेपींना कारावास व दंड
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : १३ जणांनी मिळून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत ६५ लाख ८० हजार ७६३ रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या आराेपींना सश्रम कारावास व ५३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नीलकंठ गणपत खडतकर, शांताराम संभाजी निकाेडे, मनाेहर सीताराम तावेडे, विठ्ठल माधव अंद्रसकर, भय्याजी एकनाथ आत्राम, किशाेर चक्रपाणि येलमुले, विजय मधुकर धकाते, किरण वामनराव शेरके, नरेश लक्ष्मण नागाेसे, वासुदेव वक्टू घाेडाम, प्रमाेद विश्वनाथ दुपारे, प्रभावती मनाेहरराव साेनकुसरे, मीनाक्षी नीलकंठ खडतकर यांनी १ एप्रिल १९९५ ते ३१ मार्च २००६ या कालावधीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कामकाजात गैरव्यवहार केला. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक अरुण गंगाधर मुद्देशवार यांनी ३१ मे २००७ राेजी गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली हाेती. पाेलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांच्या नेतृत्वात तपास करण्यात आला. त्यांच्याविराेधात न्यायालयात खटला दाखल केला.
मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आर. वाशिमकर यांनी आठ आराेपींना वेगवेगळ्या कलमान्वये सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाची बाजू ॲड. राऊत व अमर फुलझेले यांनी मांडली.