शाळांमध्ये लवकरच आकृतीबंध लागू होणार

By Admin | Updated: May 17, 2014 23:40 IST2014-05-17T23:40:14+5:302014-05-17T23:40:14+5:30

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये लवकरच नवीन आकृतीबंध लागू होणार आहे.

Implementation of schools will be implemented soon | शाळांमध्ये लवकरच आकृतीबंध लागू होणार

शाळांमध्ये लवकरच आकृतीबंध लागू होणार

पेंढरी(कोके) : बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये लवकरच नवीन आकृतीबंध लागू होणार आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतीच सभा घेतली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सन २०१४ पासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे शिक्षण विभागाने सादर केला आहे. पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे व तीन किमी परिसरात आठवीचा त्याच माध्यमाचा वर्ग नाही अशा शाळांमध्ये आठवीचा वर्ग जोडण्याबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांनी शिफारस केलेल्या शाळेनी इयत्ता चवथी, सातवीमधील संबंधित विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी देण्याची कार्यवाही करू नये, असे सांगितले आहे. (वार्ताहर)

Web Title: Implementation of schools will be implemented soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.