धानोरा तालुक्यात शेकडो एकर जंगलात अवैध वृक्षतोड

By Admin | Updated: January 30, 2016 02:01 IST2016-01-30T02:01:57+5:302016-01-30T02:01:57+5:30

धानोरा तालुक्यात चातगाव, कटेझरी, कुडकवाही व सिंगापूर येथील जंगलात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

Illegal tree trunk in hundreds of acres of forest in Dhanora taluka | धानोरा तालुक्यात शेकडो एकर जंगलात अवैध वृक्षतोड

धानोरा तालुक्यात शेकडो एकर जंगलात अवैध वृक्षतोड

वन विभाग सुस्त : चातगाव, कटेझरी, कुडकवाही व सिंगापूर भागात प्रकार
गडचिरोली : धानोरा तालुक्यात चातगाव, कटेझरी, कुडकवाही व सिंगापूर येथील जंगलात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. हजारो रूपये किमतीची वनसंपदा व्यापारी व धनाढ्य लोकांनी नष्ट केली असून त्यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करून या वृक्षतोडीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे जययुवक क्रांतीदल चातगावचे अध्यक्ष विलास पेंदाम, उपाध्यक्ष गणेश तोडासे, सचिव धनराज कोसरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीत जय युवक क्रांती दलाने म्हटले आहे की, शासनाने वनहक्काची जमीन गोरगरीब नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. जे अनेक वर्षांपासून या जमिनीवर उपजीविका करतात. त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असला तरी वन हक्क कायद्याचा दुरूपयोग करून चातगाव परिक्षेत्रातील जमिनीची लयलूट काहींनी सुरू केली आहे. सर्रास जंगल कापून शासकीय संपत्तीचे नुकसान केले जात आहे. सिंगापूर, चातगाव, कटेझरी येथील शेकडो एकर जंगल कापून वन जमिनी निर्माण करण्यात आल्या, असे चित्र दिसून येत आहे. सिंगापूर येथे एका व्यक्तीने ७० एकर जमिनीवरचे जंगल कापून काढले आहे. चातगाव, कटेझरी येथे अनेक प्रस्तापितांनी १० ते १२ एकर जंगल कापून शेतीत परिवर्तन केले आहे. वन विभागाच्या १० ते १२ एकर जंगल साफ करण्यात आला असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जययुवक क्रांतीदलाने दिला आहे. या भागात चांगल्या सार्वजनिक कामांसाठी तसेच शाळा, महाविद्यालय, रुग्णालय यांना जमीन देण्यास विरोध करून चोरट्यांना वृक्षतोड करून रान मोकळे करून दिले जात आहे. दीडशे एकर जागेवर वृक्षतोड झाल्याने या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही चौकशी करावी, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Illegal tree trunk in hundreds of acres of forest in Dhanora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.