पावणेसात लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
By Admin | Updated: April 30, 2015 01:37 IST2015-04-30T01:37:42+5:302015-04-30T01:37:42+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक कार्यालयातील दारूबंदी पथकाने बुधवारी चामोर्शी तालुक्यातील ...

पावणेसात लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
गडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक कार्यालयातील दारूबंदी पथकाने बुधवारी चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील दर्पणगुड्डा येथील दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकून एकूण ६ लाख ८९ हजार ९२० रूपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला.
उमेश महादेव महा (२५) रा. दर्पनगुड्डा असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दारूबंदी पथकाचे पोलीस निरिक्षक विनायक कोळी यांनी बुधवारी दर्पनगुड्डा येथील उमेश महा याच्या घरी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी ७ हजार २०० रूपये किमतीच्या विदेशी दारूच्या ४८ निपा, ९२० रूपये किमतीचे विदेशी दारूच्या १२ बॉटला, रोख चार हजार रूपये असा एकूण १३ हजार १२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मिळालेला संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेऊन दारू विक्रेता आरोपी उमेश महा याला अटक केली. त्याच्यावर चामोर्शीच्या पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (ई), ६७, ८३ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस निरिक्षक विनायक कोळी, पोलीस हवालदार इरमलवार, डांगे, उराडे, पोलीस नाईक ढवळे, पोलीस शिपाई बांबोळे, जौंजारकर, तायडे, मुंडे आदींनी केली. दारूबंदी पथकाच्या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)