अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:43 IST2021-02-20T05:43:26+5:302021-02-20T05:43:26+5:30
गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी अधिक मजबूत व्हावी व कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह ...

अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणार
गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी अधिक मजबूत व्हावी व कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मुक्तिपथची बैठक झाली होती. त्यामध्ये ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्यानुसार, उपविभाग स्तरावरील बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या एटापल्ली पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र हालेवारा, कसनसूर, कोटमींतर्गत गावांतील अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे नियोजन व एटापल्ली तालुक्यातील त्रासदायक गावांची व दारू तंबाखू विक्रेत्यांची यादी तयार करण्यात आली. पोलीस स्टेशनला अवैध दारूच्या तक्रारी १५ दिवसांत निकाली काढणे, दर महिन्याला तालुका पोलीस अधिकारी, पोलीस बिट अंमलदार, पोलीस पाटील, मुक्तिपथ तालुका संघटक यांची बैठक होणे गरजेचे आहे. ज्या गावात किंवा वाॅर्डात रेड करणे आहे. त्या गावातील पोलीस पाटील यांनी अवैध दारूविक्रेत्यांची माहिती देणे गरजेचे आहे. दर दोन महिन्यांतून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन तालुक्यात आलेल्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे. ज्या गावात रेड करायची आहे, त्याचे नियोजन व दर आठवड्यातून पाठपुरावा घेणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील दारू व तंबाखू विक्रेत्यांवर ॲक्शन प्लॅननुसार कारवाई झाल्यास दारू व तंबाखूमुक्त तालुका निर्माण होण्याची शक्यता आहे.