शिवरायांच्या विचारानुसार काम केल्यास सामान्यांची प्रगती शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:43 IST2021-02-20T05:43:54+5:302021-02-20T05:43:54+5:30
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून झेंडा फडकविताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : महाराष्ट्राच्या भूमीत ...

शिवरायांच्या विचारानुसार काम केल्यास सामान्यांची प्रगती शक्य
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून झेंडा फडकविताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार आणि कार्य आधुनिक काळात सर्वच क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे. शिवरायांच्या विचारानुसार राज्यकर्त्यांनी काम केल्यास सर्वसामान्यांची प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
गडचिराेली तालुक्यातील मुरमाडी येथे गुरुवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशाेक नेते हाेते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जि.प. उपाध्यक्ष मनाेहर पाेरेटी, रवींद्र भुसारी, प्रमुख वक्ते दिलीप चाैधरी, तसेच जि.प. सदस्य जगन्नाथ बाेरकुटे, पं.स. सभापती माराेतराव इचाेडकर, उपसभापती विलास दशमुखे, पं.स. सदस्य रामरतन गाेहणे, माजी जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, सामाजिक कार्यकर्ते याेगाजी बनपूरकर, प्रभाकर वासेकर आदी उपस्थित हाेते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी येथील युवकांनी केलेले कार्य काैतुकास्पद आहे, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी सांगितले.
याप्रसंगी खा. अशाेेक नेते, जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वाघरे, संचालन वासंती देशमुख यांनी केले, तर आभार सचिन भुसारी यांनी मानले.