वाघाची शिकार झाली तर दखल, माणसांची शिकार मात्र बेदखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:38+5:302021-08-25T04:41:38+5:30
वडसा वनविभागांतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्रातील कार्यक्षेत्रात आणि गडचिरोली वनविभागाच्या हद्दीतील इंदिरा नगर, गोगाव, महादवाडी, कुराडी, धुंडेशिवनी, चुरचुरा, भिकारमौशी, करमटोला येथील ...

वाघाची शिकार झाली तर दखल, माणसांची शिकार मात्र बेदखल!
वडसा वनविभागांतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्रातील कार्यक्षेत्रात आणि गडचिरोली वनविभागाच्या हद्दीतील इंदिरा नगर, गोगाव, महादवाडी, कुराडी, धुंडेशिवनी, चुरचुरा, भिकारमौशी, करमटोला येथील महिला व पुरुषांना वाघाने जिवानिशी ठार केले. शासन दरबारी वाघाच्या जीवाचे मोल आहे, त्यामुळे वाघाची शिकार झाली तर संपूर्ण प्रशासन जागे होते आणि लगेच कायदेशीर कारवाई केली जाते. परंतु सात ते आठ गावातील महिला व पुरुष, तथा गुरांची वाघाने शिकार केली. त्याबाबतच्या नोंदीसुद्धा वनविभागाकडे आहेत, पण शासन व वनविभागाचे कर्मचारी अजूनही नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यास असमर्थ ठरत असल्याबद्दल निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली.
भारतीय जनसंसदेने यासंदर्भात वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, सचिव नीलकंठ संदोककर, उपाध्यक्ष रमेश बांगरे, रवींद्र सेलोटे, शुभम खरवडे, बंडू सोनवाने, संजय दशमुखे, ईश्वर तिवाडे आदी उपस्थित होते.
240821\img-20210824-wa0033.jpg
धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक यांना निवेदन देतांना भारतीय जनसंसदेचे पदाधिकारी