शिवसेना सत्तेत असली तर आंदोलन करणार
By Admin | Updated: October 7, 2015 02:25 IST2015-10-07T02:25:56+5:302015-10-07T02:25:56+5:30
शिवसेना सत्तेत असले तरी सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांसाठी शासनाच्याच विरोधात आंदोलन करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहणार नाही,...

शिवसेना सत्तेत असली तर आंदोलन करणार
किशोर कन्हेरे यांचे प्रतिपादन : कुरखेडात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा
कुरखेडा : शिवसेना सत्तेत असले तरी सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांसाठी शासनाच्याच विरोधात आंदोलन करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहणार नाही, गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक सदैव झटत व झिजत राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर कन्हेरे यांनी केले.
शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा कुरखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किशोर कन्हेरे बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी जिल्हाप्रमुख हरीश मने, माजी आ. रामकृष्ण मडावी, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, डॉ. महेंद्र मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, उपजिल्हा संघटक अशोक गावतुरे, नसरू भामानी, नंदू चावला, विजय बुल्ले, चंदू बेहरे, कवडू सहारे, अनंत बेझलवार, दामू उईके, बबन बुद्धे, पुंडलिक देशमुख, मनोहर लांजेवार, नरेंद्र तिरनकर, दिगांबर मानकर, निलकमल मंडल, गट्टू नुकूम, राजगोपाल सुल्लावार, प्रशांत किलनाके, मधुकर चौधरी, सोनलवार, सोनू भट्टड, खुशाल बन्सोड, सरपंच ममीता आडे, अप्पा सोमकुवर, माया आलाम, बोरकर, मीना भोयर, गौरी उईके, दुर्गा सयाम, छगन सेडमाके, अशोक गायकवाड, नूतन सातव, शैलेश चिटमलवार, पुरूषोत्तम तिलगाम, लोमेश कोटांगले आदी मान्यवर उपस्थित होते.
जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्याबरोबरच सत्तेत असणे फार महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीदरम्यान सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवून मते मागावी, जिल्ह्यातील ओबीसी, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना धरून रस्त्यावर उतरण्यास शिवसेना कधीच मागेपुढे पाहणार नाही, नगर पंचायत निवडणूक प्रत्येक कार्यकर्त्यांनी ताकदीनीशी लढले पाहिजे, असे आवाहन किशोर कन्हेरे यांनी कार्यकर्त्यांना केले. (तालुका प्रतिनिधी)