गुंडापल्लीच्या पोलीस पाटलाचे लग्न लागल्यास आत्मदहन करणार
By Admin | Updated: June 17, 2016 01:29 IST2016-06-17T01:29:18+5:302016-06-17T01:29:18+5:30
गुंडापल्ली येथील पोलीस पाटील किशोर सीताराम सिडाम याने आपल्याशी २००२ पासून प्रेम संबंध व शारीरिक संबंध ठेवल्याने २००६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले.

गुंडापल्लीच्या पोलीस पाटलाचे लग्न लागल्यास आत्मदहन करणार
पीडित महिलेचा पत्रकार परिषदेतून इशारा
आष्टी : गुंडापल्ली येथील पोलीस पाटील किशोर सीताराम सिडाम याने आपल्याशी २००२ पासून प्रेम संबंध व शारीरिक संबंध ठेवल्याने २००६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु ११ वर्षानंतर आपल्याला डावलून किशोर मडावी हा लगाम येथील एका तरूणीशी १७ जून रोजी विवाह करीत आहे. त्याचे लग्न लागल्यास लग्नस्थळी आपण मुलासह आत्मदहन करणार, असा इशारा सिरोंचा तालुक्याच्या कंबालपेठा येथील पीडित महिलेने गुरूवारी आष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिला. यासंदर्भात सदर महिलेने आष्टी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.
घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीडित महिलेने सांगितले की, कंबालपेठा येथे किशोर सिडाम यांचा मामा राहत असल्याने ते येथे ये-जा करीत होते. २००२ पासून आमचे प्रेम संबंध जुळले. या प्रेम संबंधातून मे २००६ मध्ये आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. याची रितसर नोंद ग्रामपंचायत मादाराम येथे करण्यात आली आहे. १४ वर्षापर्यंत आपल्याशी शारीरिक संबंध ठेवून व ११ वर्षांचा मुलगा असतानाही किशोर सिडाम दुसरा विवाह १७ जून २०१६ रोजी करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणारा विवाह किशोर सिडाम यांनी न थांबविल्यास आपण मुलासह केरोसीन ओतून विवाहस्थळी आत्मदहन करणार, असा इशारा पीडित महिलेने दिला आहे.
पत्रकार परिषदेला बसपाचे महासचिव शंकर बोरकुट, पोलीस पाटील राजन्ना गोद, तंमुस अध्यक्ष गणेश दुर्गम, मुत्तया नरवेदी, श्रीनिवास कांबळे, शंकर कोंडागुर्ले, आनंदराव वडेटी, राजन्ना दुर्गे, मनोहर कावेरी, रोशन्ना अल्लुरी, स्वामी अल्लुरी, श्रीया वेलादी, वंगो कुळमेथे यांच्यासह ५० ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)