ठरावावर निर्णय न झाल्यास ग्रा. पं. ला कुलूप ठोकणार

By Admin | Updated: October 1, 2015 01:42 IST2015-10-01T01:42:49+5:302015-10-01T01:42:49+5:30

चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील ग्राम पंचायतीच्या सभागृहात झालेल्या १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढणे, ...

If the decision is not taken decision, Pt La locking | ठरावावर निर्णय न झाल्यास ग्रा. पं. ला कुलूप ठोकणार

ठरावावर निर्णय न झाल्यास ग्रा. पं. ला कुलूप ठोकणार

पत्रकार परिषद : इल्लूरच्या ग्रामस्थांचा इशारा
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील ग्राम पंचायतीच्या सभागृहात झालेल्या १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढणे, शिवाजी चौकातील अतिक्रमण काढून २० जुलै २०१५ रोजी घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे तसेच ग्रा. पं. ने बांधलेल्या रंगमंचाला नाव देण्याबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय न झाल्यास ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
इल्लूर ग्राम पंचायतीच्या वतीने १५ टक्के इतर मागासवर्गीय ग्राम निधीतून रंगमंचाचे बांधकाम करण्यात आले. सदर रंगमंचाला इतर मागासवर्गीय रंगमंच असे नाव देण्याचे ठरले. परंतु ग्रा. पं. च्या सचिवांनी ग्रा. पं. कमिटीला हाताशी घेऊन रंगमंचाला थोर पुरूषाचे नाव देण्याबाबत ११ जुलै २०१५ ला ठराव पारीत केला. त्यानंतर गावकऱ्यांनी १३ जुलै २०१५ ला ग्रा. पं. ला अर्ज देऊन याबाबत विचारणा केली असता, सरपंच निरंजना मडावी यांनी २० जुलै २०१५ रोजी सभा घेऊन या विषयावर चर्चा घडवून आणली. सदर विषय २/३ मतांनी पारीत न झाल्याने ११ जुलैच्या ठरावात सुधारणा करणे किंवा रद्द करण्यासाठी ग्रा. पं. अधिनियमानुसार तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे पत्र गावकऱ्यांना दिले. याला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असल्याने सदर विषयावर योग्य ती कारवाई न झाल्यास गावकरी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकणार, असा इशारा गावकऱ्यांनी दिला.
१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत वरील तीनही विषय सर्वानुमते मंजूर करून ठराव पारीत करण्यात आला. मात्र त्यावर कारवाई करण्याबाबत ग्राम पंचायत उदासीन आहे.
कोणत्याही कामाला मंजुरी देताना ग्रामसभेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. स्मशानभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढून टाकण्याबाबतही ठराव झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व बाबीची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, खासदार यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती राजेंद्र पातर, विलास बोरकुटे, गिरीधर बामनकार, विजय बद्दलवार, मारोती बामनवाडे, विनायक बावणे, गणेश गुडेकर, रवी बामनकर, प्रभाकर आत्राम, विनोद चौधरी, राकेश कुंदावार, युवराज बोरकुटे, मनोज शिंदे, मदन लांबाडे, संतोष सातर, जयंत पातर, अनंत बोरकुटे, दिलीप नागापुरे, देवराव कुबळे, विश्वनाथ बामनकर, गोपाळा बामनकर, विस्तारी पाटील चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: If the decision is not taken decision, Pt La locking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.