बेवारस इसमाची ओळख पटली

By Admin | Updated: February 12, 2017 01:20 IST2017-02-12T01:20:48+5:302017-02-12T01:20:48+5:30

तालुक्यातील मादाराम प्रवाशी निवाऱ्यापासून आलापल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर नक्षल शोधमोहिमे दरम्यान

I was unaware of it | बेवारस इसमाची ओळख पटली

बेवारस इसमाची ओळख पटली

मादाराम जंगल परिसरात : पोलिसांना सापडला होता मृतदेह
सिरोंचा : तालुक्यातील मादाराम प्रवाशी निवाऱ्यापासून आलापल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर नक्षल शोधमोहिमे दरम्यान बामणी पोलिसांना एका लहानशा नाल्यावरील पुलाखाली अनोळखी इसमाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत गुरूवारी आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती. सदर इसमाची ओळख पोलिसांनी पटविली आहे. लचमा कन्ना सिडाम (७३) रा. रेपनपल्ली तालुका अहेरी असे मृतक इसमाचे नाव आहे.
प्रेत कुजलेल्या अवस्थेत असून डोक्यावर २ इंच लांबीचे काळे - पांढरे केस, अंगात उभ्या पांढऱ्या रेषा असलेला काळसर रंगाचा शर्ट, आतमध्ये निळ्या, काळ्या, पांढऱ्या आडव्या पट्ट्याची टीशर्ट, कमरेस पिवळ्या, निळ्या, काळ्या, हिरव्या लायनर असलेली लुंगी व उजव्या हातामध्ये दोन शेंदऱ्या रंगाचे धागे बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. सदर घटनेचा तपास एसडीपीओ गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बामणी उपपोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे सुरू केला. मृतक इसम २१ जानेवारीपासून बेपत्ता होता. बिनतारी संदेशाद्वारे माहिती पोहोचल्यानंतर मृतकाच्या नातेवाईकाने त्याला ओळखले. पोलिसांनी शवविच्छेदन करून सदर प्रेत पुरले. पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: I was unaware of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.