आईपेठावरून माघारी परतले

By Admin | Updated: April 7, 2016 01:12 IST2016-04-07T01:12:40+5:302016-04-07T01:12:40+5:30

मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्याकरिता पोलीस बंदोबस्तात गेलेल्या चमूला आईपेठा गावातील शेतकरी, शेतमजूर ...

I returned from the IPP | आईपेठावरून माघारी परतले

आईपेठावरून माघारी परतले

मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाचे सर्वेक्षण करणारे पोलीस बंदोबस्तातील पथक
सिरोंचा : मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्याकरिता पोलीस बंदोबस्तात गेलेल्या चमूला आईपेठा गावातील शेतकरी, शेतमजूर व महिलांनी विरोध केल्यामुळे पथकाला माघारी परतावे लागले. या आंदोलनाचे नेतृत्व किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेली यांनी केले.
बुधवारी सकाळी ११ वाजता सिरोंचाचे तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांच्यासह अधिकारी जी. रवींदर, नंदा हे सिरोंचाचे पोलीस अधिकारी दीपक लुकडे, पोलीस उपनिरिक्षक कदम, आसरअल्लीचे पोलीस अधिकारी यांच्या बंदोबस्तात सर्वेक्षण कामासाठी आईपेठा गावात पोहोचले. याबाबत गावकऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या प्रकल्पाला पूर्वीपासूनच या परिसरातील लोकांचा विरोध लक्षात घेता अचानक पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षणासाठी आलेल्या या पथकाला शेतकरी, गावकरी, शेतमजूर, महिला यांनी प्रखर विरोध केला. किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेली यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन ग्रामस्थांनी बोलावून घेतले व यानंतर जमावाने तहसीलदारांचा निषेध करीत प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे तहसीलदारांनी सर्वेक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला व पथक माघारी फिरले. यावेळी वेमुला सत्यनारायण, किरण वेमुला, कोमेरे वेंकला, श्रीरंगी लक्ष्मण, ताटी राजू, सिरंगी राजबाबू, सरपंच मडे राजबाबू, ओद्दी राजबाबू, सिडाम लच्छीरेड्डी, सिरंगी नागेश, जी. डी. सत्यम, सिरंगी अविनाश, ताटी रमेश, ताटी क्रिष्टय्या, वेमुला प्रकाश आदींसह गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आईपेठा येथे सर्वेक्षणासाठी तेलंगणाचे दोन सिंचन अभियंतेही आले होते. त्यात जी. रविंदर व नंदा यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: I returned from the IPP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.