गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या
By Admin | Updated: April 18, 2015 01:39 IST2015-04-18T01:39:54+5:302015-04-18T01:39:54+5:30
येथील एंका इसमाने चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या
आलापल्ली : येथील एंका इसमाने चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेत तीन वर्षीय चिमुकला बालक गंभीर जखमी झाला आहे. राधिका राजू कोरेत (२३) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी राजू कोरेत यास अटक केली आहे.
राजू कोरेत हा आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक दोन मधील गोंड मोहल्ल्यातील साई मंदिराजवळ पत्नी व लहान मुलासमवेत वास्तव्य करीत होता. गेल्या काही दिवसांपासून तो वैफल्यग्रस्त स्थितीत होता. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्याने पत्नी राधिका हिच्या मानेवर विळयाने वार केला. यामुळे तिने जागीच प्राण सोडला. तसेच त्याने आपल्या शुभम तीन वर्षीय बालकावरही वार करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारच्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने बालक व त्याचे वडील बचावले. जखमी बालकास उपचारासाठी अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चारित्र्यावर संशय घेऊन राजू कोरेत याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे आलापल्ली शहरात खळबळ माजली असून, पोलिसांनी आरोपी राजू कोरेत यास अटक केली आहे. (वार्ताहर)