हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 01:36 IST2017-02-05T01:36:50+5:302017-02-05T01:36:50+5:30

गडचिरोली विभागातील हरभरा पिकाची कॉप शॅप प्रकल्प २०१६-१७ अंतर्गत नुकतीच गडचिरोली,

Hurricane attack | हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला

हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला

कीड व रोग सर्वेक्षण : गडचिरोली, चामोर्शी, धानोरा तालुक्यात प्रादुर्भाव
गडचिरोली : गडचिरोली विभागातील हरभरा पिकाची कॉप शॅप प्रकल्प २०१६-१७ अंतर्गत नुकतीच गडचिरोली, चामोर्शी, धानोरा तालुक्यात पाहणी करून कीड व रोग सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी, खुर्सा, अमिर्झा, चांभार्डा आदी गावांमध्ये तर चामोर्शी तालुक्यातील तांबासी, कुनघाडा रै. नवेगाव, भेंडाळा, धानोरा तालुक्यातील साखेरा, चातगाव परिसरातील गावांमध्ये हरभरा पिकावरील कीड व रोगाचे सर्वेक्षण करण्यात आले. तांत्रिक सर्वेक्षणाअंती हरभरा पिकावर फुलोरा आला असल्याचे दिसून आले. सोबतच फुलोरा फळधारणेच्या अवस्थेत असून पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कॉप शॅप अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कीड नियंत्रक, कीड व रोग सर्वेक्षक आदींनी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची वेळोवेळी तांत्रिक पद्धतीने पाहणी करून कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने निष्कर्ष काढून उपाययोजना करण्याचे सूचविण्यात आल्या आहे. सदर पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी डोंगरवार, कीड नियंत्रक दिहारे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

अशी करा उपाययोजना
वातावरणातील बदलामुळे व किडीस पोषक परिस्थितीमुळे पुढील काळात कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पिकाची नियमित पाहणी करावी, प्रतिबंधक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा एचएनपीव्ही २५० एलई विषाणूची फवारणी करावी. रासायनिक औषधी क्लिनाल फॉस २५ ईसी, २० मिली व १० लीटर पाणी किंवा ट्राय झेपास ३५ टक्के व डेल्टामेथ्रीन १ टक्का २० मिली व १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 

Web Title: Hurricane attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.