जलजागृतीसाठी शेकडो युवक-युवती धावल्या
By Admin | Updated: March 21, 2016 01:11 IST2016-03-21T01:11:00+5:302016-03-21T01:11:00+5:30
जलजागृती सप्ताहादरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरात मॅराथॉन युवा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात

जलजागृतीसाठी शेकडो युवक-युवती धावल्या
गडचिरोली : जलजागृती सप्ताहादरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरात मॅराथॉन युवा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शेकडो युवक- युवती जलजागृतीसाठी उत्स्फूर्तपणे धावल्या. विशेष म्हणजे, या मॅराथॉनमध्ये जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रशासनाच्या वतीने १६ ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी शहरात युवा दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी युवकांशी जल नियोजनाबाबत चर्चा केली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलजागृती सप्ताहादरम्यान पाण्याचा अपव्यय टाळून पुरेसा उपयोग करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)