वाचन संस्कृतीतून मानवी मनाचा विकास\
By Admin | Updated: January 6, 2015 23:01 IST2015-01-06T23:01:30+5:302015-01-06T23:01:30+5:30
पुस्तके माणसाच्या मनावर संस्कार करतात. पुस्तकांमुळेच वैचारिक प्रगल्भता व सामाजिक जाण रुंदावत जाते. त्याच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञान लाभले असले तरी वाचन

वाचन संस्कृतीतून मानवी मनाचा विकास\
गडचिरोली : पुस्तके माणसाच्या मनावर संस्कार करतात. पुस्तकांमुळेच वैचारिक प्रगल्भता व सामाजिक जाण रुंदावत जाते. त्याच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञान लाभले असले तरी वाचन संस्कृतीतूनच मानवी मनाचा विकास खऱ्या अर्थाने होतो, असा सूर परिसंवादातील साऱ्याच वक्त्यांनी काढला.
शिक्षण विभाग जिल्हा परिषद व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सवादरम्यान ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वाचन संस्कृतीवर होणार परिणाम’ या विषयावर आयोजित परिसंवादाचे उद्घाटन विद्यार्थिनी कृष्णा देशमुख हीच्या हस्ते करण्यात आले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डी. एन. चापले होते. प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य मेश्राम, प्रा. नरेंद्र आरेकर, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाठ, प्रा. विलास खुणे, चेतन ठाकरे, जयंत येलमुले, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, सविता सादमवार आदी उपस्थित होते. आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमांचा समाजमनावर सकारात्मक परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र अलीकडच्या काळातील इंटरनेटचलीत सोशल मीडियामुळे तंत्रज्ञानाचा पगडा वाढला असल्याची खंतही वक्त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानामुळे एका क्लिकवर माहिती उपलब्ध होण्याची सोय असली तरी ग्रंथ वाचनातून मनावर होणारे संस्कार आजही तितकेच परिणामकारक आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावातही वाचन संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे, असे मत मांडले. (स्थानिक प्रतिनिधी)