गडचिरोलीत २८ ला विशाल हिंदू संमेलन
By Admin | Updated: December 24, 2014 22:59 IST2014-12-24T22:59:41+5:302014-12-24T22:59:41+5:30
विश्व हिंदू परिषद जिल्हा गडचिरोलीच्यावतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त २८ डिसेंबर रोजी रविवारला गडचिरोली येथील अयोध्यानगरात विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची

गडचिरोलीत २८ ला विशाल हिंदू संमेलन
गडचिरोली : विश्व हिंदू परिषद जिल्हा गडचिरोलीच्यावतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त २८ डिसेंबर रोजी रविवारला गडचिरोली येथील अयोध्यानगरात विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये व चंद्रपूर विभागाचे पदाधिकारी प्रा. डॉ. सुरेश परसावार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहिती देताना प्रा. सुरेश परसावार म्हणाले, विश्व हिंदू परिषदेच्यावतीने २०१४-१५ हे वर्ष सुवर्ण जयंती महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या वर्षात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने गोरक्षण, रक्तदान शिबिर व अन्य सामाजिक उपक्रम घेण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने हिंदू हेल्प लाईन सुरू करण्यात आली असून गरजूंना आवश्यक ती मदत देण्याचे धोरण विहिपने अवलंबिले आहे. विशाल हिंदू संमेलनाच्या दिवशी ग्रामीण स्तरावर शोभा यात्रा काढण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हामंत्री रामायण खटी, रमेश भुरसे, कासर्लावार, वडेट्टीवार उपस्थित होते.