वाढत्या महागाईने घरकुल बांधकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST2021-04-04T04:37:49+5:302021-04-04T04:37:49+5:30

देसाईगंज तालुक्यातील लोकसंख्येच्या आधारावर व क्षेत्रफळानुसार कुरुड आणि कोंढाळा ही गावे माेठी आहेत. या दाेन्ही गावात बऱ्याच ...

Housing construction stalled due to rising inflation | वाढत्या महागाईने घरकुल बांधकामे ठप्प

वाढत्या महागाईने घरकुल बांधकामे ठप्प

देसाईगंज तालुक्यातील लोकसंख्येच्या आधारावर व क्षेत्रफळानुसार कुरुड आणि कोंढाळा ही गावे माेठी आहेत. या दाेन्ही गावात बऱ्याच प्रमाणात लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहेत तर अनेक घराचे काम सुरू आहेत; परंतु सध्या नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने अनेक नवीन घरांचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहेत. घरकुलासाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत जास्त तर घरकुलासाठी निधी पुरेसा नसल्याची माहिती घरकुल लाभार्थी देत आहेत. एकदाच घर होते म्हणून लाभार्थी चांगल्या प्रकारे घर बांधत असतो; मात्र त्याचा फटका त्यालाच सहन लागतो. कोंढाळा येथील नागरिक व्याजाने पैसे काढून घर पूर्ण करत आहेत तर सकाळी दुसऱ्याच्या कामावर तर रात्रीला घरी काम करून दोन पैसे जास्त मिळवून स्वतःच घर बांधत आहेत. पण दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

आधीच बांधकामाचे साहित्याचे वाढलेले भाव आता त्यात इंधन दर वाढीची भर पडली आहे. कारण इंधन दर वाढाल्याने वाहतुकीचा खर्चसुद्धा वाढला असल्याने घरकुल लाभार्थीला जास्त प्रमाणात पैसे मोजून द्यावे लागत आहेत. तसेच विटाचे भाव ८ ते ९ हजार रुपये ट्रिप आहे तर दुसरीकडे सिमेंटचे भाव वाढले आहेत आणि रेती तर मिळतच नसल्याने घरकुल लाभार्थ्यांचे हाल होत आहेत म्हणून शासनाने घरकुल निधी वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Web Title: Housing construction stalled due to rising inflation