ओबीसींचे चामोर्शीत आमदारांच्या घरासमोर घंटानाद

By Admin | Updated: August 26, 2016 01:17 IST2016-08-26T01:17:05+5:302016-08-26T01:17:05+5:30

ओबीसींच्या विविध मागण्यांकडे आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी ...

Hours before OBC's Chamorshite MLA's house | ओबीसींचे चामोर्शीत आमदारांच्या घरासमोर घंटानाद

ओबीसींचे चामोर्शीत आमदारांच्या घरासमोर घंटानाद

चामोर्शी : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी येथील निवासस्थानासमोर ओबीसी बांधवांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विनोद खोबे, मारोती दुधबावरे, दिलीप चलाख, राहुल नैताम, निशांत नैताम, अविनाश चौधरी, रमेश झरकर, सदाशिव मेश्राम, किरण आकुलवार, दिनेश चौधरी, विनायक कुनघाडकर, अतुल येलमुले, शंकर दास, महेश खोबे, राजू नंदगिरवार, विलास चुधरी, रूषीदेव कुनघाडकर, जयराम चलाख, रमेश नैताम, सतीश सोमनकर, लचमा शिरघावार, मोरेश्वर आभारे, पोचू कोरीवार, सुनील कावळे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. डॉ. देवराव होळी यांना ओबीसी बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार डॉ. होळी म्हणाले की, या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. ओबीसी बांधवांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात येईल, मी ओबीसी समाजासोबत राहणार व त्यांच्या मागण्या सोडविणार आहे, असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदनात लोकसंख्येच्या प्रमाणात ६० टक्के जागा ओबीसींसाठी राखीव ठेवाव्या, नॉनक्रिमिलिअरची अट रद्द करावी, ओबीसींची सर्व वर्गातील २७ टक्के पदे भरण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च शिक्षणासाठी १०० टक्के फ्रीशिप देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Hours before OBC's Chamorshite MLA's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.