रूग्णालय हाऊसफूल्ल

By Admin | Updated: September 18, 2014 23:34 IST2014-09-18T23:34:04+5:302014-09-18T23:34:04+5:30

दमट वातावरणामुळे ग्रामीणसह शहरी भागातही डेंग्यू, हिवताप, टायफाईड, फायलेरिया, काविळ, अतिसार आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. त्यामुळे रूग्णांचा ओढा जिल्हा सामान्य

Hospital Housefull | रूग्णालय हाऊसफूल्ल

रूग्णालय हाऊसफूल्ल

ग्रामीण भागातूनही रूग्णांचा ओढा : डेंग्यू, मलेरिया रोगांची साथ
गडचिरोली : दमट वातावरणामुळे ग्रामीणसह शहरी भागातही डेंग्यू, हिवताप, टायफाईड, फायलेरिया, काविळ, अतिसार आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. त्यामुळे रूग्णांचा ओढा जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढला असल्याने संपूर्ण रूगणालय हाऊसफूल्ल झाले आहेत. मागील आठ दिवसात सुमारे १२०० रूग्ण दाखल झाले आहेत.
मागील आठवड्यात झालेला दमदार पाऊस त्यानंतर प्रचंड प्रमाणात वाढलेला उकाडा यामुळे तापाचे रूग्ण, साथीच्या आजाराचे रूग्ण यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात खासगी रूग्णालयांची संख्या अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागामध्ये असलेल्या शासकीय रूग्णालयांमध्येही सोयीसुविधांची वाणवा आहे. त्यामुळे जिल्हाभरातील बहुतांश रूग्ण गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल होऊन उपचार घेतात. त्याचबरोबर चंद्रपूर, भंडारा व छत्तीसगड राज्यातीलही रूग्ण याच रूग्णालयाला पसंती दर्शवितात. या सर्व कारणांमुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील आठवड्यात दाखल होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चालू आठवड्यात सुमारे १२०० रूग्ण दाखल झाले आहेत. रूग्णालयात केवळ २०० खाटांची व्यवस्था आहे. त्यामुळे इतर रूग्णांना वार्डात व वऱ्हांड्यात जमिनीवर खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. रूग्ण व नातेवाईकांच्या गर्दीमुळे संपूर्ण वार्ड नागरिकांनी हाऊसफूल्ल झाले आहेत. डॉक्टरांनाही उपचार करण्यासाठी रूग्णांना ओलांडून गेल्याशिवाय पर्याय नाही.
सामान्य रूग्णालयातील बहूतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. तापाच्या आजाराचे रक्ताचे नमुणेही घ्यावे लागतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या रक्तपेढीवरही भार वाढलेला आहे. बाहेरगावच्या रूग्णालयातून रेफर केलेले अनेक गंभीर रूग्णही जिल्हा सामान्य रूग्णालयात आहेत. याशिवाय संसर्गजन्य आजाराचेही अनेक रूग्ण दाखल होत असल्याने रूग्णालयाच्या दैनंदिन यंत्रणेवरचा भार वाढत आहे. रूग्णालयात औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात असला तरी बरेच पेशंट बाहेर औषध खरेदीसाठी जातात. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Hospital Housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.