नवमतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:27+5:302021-02-05T08:51:27+5:30
गडचिराेली : अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिनाचे आयाेजन करण्यात आले. या वेळी नवमतदारांचा डिजिटल ओळखपत्र ...

नवमतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांचा सन्मान
गडचिराेली : अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिनाचे आयाेजन करण्यात आले. या वेळी नवमतदारांचा डिजिटल ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच काही निवडणूक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान केला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची मतदान शपथ दिली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपादेे, पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे, तहसीलदार महेंद्र गणवीर व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये निखिल पडगेलवार, प्रतीक्षा पिपरे, सलमान शेख, विकास शेंडे, अनिकेत पडगेलवार व मोहित पिपरे यांचा समावेश होता. तसेच मतदार दिनानिमित्त मागील आठवड्यात चित्रकला, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना प्रशस्तिपत्रक व पुष्पगुच्छ देऊ सन्मानित केले. विजेत्यांमध्ये चित्रकला स्पर्धेत दर्शना वंजारी, रितिका गोहणे व आशिष शेडमाके यांचा समावेश होता. रांगोळी स्पर्धेत पायल भोयर, रितिका सुधीर गोहणे व रितीशा आडेपू यांना सन्मानित करण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उत्तम खेवले, पी.बी. जनबंधू, विजय भांडेकर यांचाही सन्मान करण्यात आला.
या वेळी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर म्हणाले, इतर राष्ट्रीय दिनांसारखेच मतदार दिनाचे महत्त्व आहे. या दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयाेजन करून नागरिकांमध्ये लाेकशाहीबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्त, भारत सरकार यांचा मतदारांना देण्यात आलेला संदेश चलचित्र स्वरूपात दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार देवेंद्र दहीकर यांनी केले.